ब्रेकिंग बातम्या

ब्रेकिंग ! बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावास

मुंबई

images (60)
images (60)

राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे . चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे .

बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती लपवणं बच्चू कडूंना महागात पडल्याची चर्चा आहे . भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्या बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार केली होती . बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही , असा आरोप बच्चू कडूंवर होता . याच आरोपांवरुन 2017 मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!