जालना जिल्हा
RTE नोंदणीकडे 21 इंग्रजी शाळांची पाठ
प्रतिनिधी | जालना
जालना जिल्ह्यातील आरटीई पात्र शाळांकडून सध्या नोंदणी करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालय शिक्षण विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 300 पैकी 21 शाळांनी अद्यापही नोंदणी केली नसल्याने अशा शाळांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
इंग्रजी शाळांमध्ये आरटीई कोट्यामधून 25 टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. त्याचा मोबदला इंग्रजी शाळांना शासनाकडून मिळत असतो.
यंदा देखील RTE प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी 300 शाळांना ऑनलाइन नोंदणी करण्याच आवाहन शिक्षण विभागाने केलं होतं. या आवाहनाला काही शाळांनी प्रतिसाद दिला असला तरी अद्यापही 21 शाळांनी ऑनलाईन नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे.
या शाळांनी तात्काळ नोंदणी करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी दिला आहे.