जालना जिल्हा

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षा काळात जिल्ह्यात 144 कलम लागु

images (60)
images (60)

      जालना दि. 23 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक परीक्षा (इ.12 वी) दि. 4 मार्च 2022 ते दि. 30 मार्च 2022 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) दि. 15 मार्च 2022 ते दि. 4 एप्रिल 2022 या कालावधीत विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे.

      या परिक्षेच्या कालावधीत परिक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये याकरीता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शिक्षण मंडळ, औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांनी जालना जिल्ह्यात निश्चित केलेल्या परिक्षा केंद्र परिसरातील 100 मीटर हद्दीत परिक्षा केंद्राच्या परिसरात घुटमळत राहणे त्यांच्या या कृतीमुळे परिक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, उक्त परिक्षा केंद्राजवळच्या 100 मीटरच्या परिसरातील  सर्व सार्वजनिक टेलिफोन,एसडीटी बुथ, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परिक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत. वरील परिक्षा  कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागु करणे आवश्यक आहे.

     अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके जालना याद्वारे फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन वरील केंद्राच्या 100 मीटर परिसरात याद्वारे प्रतिबंधात्मक आदेश लागु करीत आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परिक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार हा आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे. हा आदेश वरील परिक्षा कालावधीत सकाळी 8.00 ते सायंकाळी  5.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.

असे अपर जिल्हादंडाधिकारी जालना आदेशीत केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!