जालना क्राईम

कार, दुचाकीची समोरासमोर धडक : देवी दहीगाव चौफुलीजवळ घडली घटना

कुंभारपिंपळगाव / प्रतिनिधी

images (60)
images (60)

रस्त्याचे काम करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या मजुराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील देवी दहीगाव चौफुली जवळ बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. गणेश ज्ञानोबा राठोड (४८ रा.परतवाडी,ता परतूर) असे मयताचे नाव आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे.


गणेश राठोड व राहुल नारायण चव्हाण हे दोघे दहीगव्हाण येथे रस्त्याचे काम करून बुधवारी रात्री दुचाकी क्रमांकाने घरी जात होते. देवी दहीगाव चौफुली जवळ आल्यावर कार क्रमांक (एमएच.२१.एएक्स.३५७५) व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात गणेश राठोड हे जागीच ठार झाले.

तर राहुल चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाल्यानंतर कार चालक फरार झालेला आहे. या प्रकरणी कार चालकाविरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेकॉ. रामदास केंद्रे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!