जालना जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनास देण्याचे आवाहन
जालना दि.24 :- सद्यस्थितीत युक्रेन व रशिया या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे 02482- 223132 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा jalnaddmodcr@gmail.com या ई मेलवर द्यावी,
असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथे हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून त्याचा टोल फ्री क्रमांक 1800118797 असा असून दूरध्वनी क्रमांक 011-2312113,23014105, 23017905, फॅक्स क्रमांक 011-23088124 तर ईमेल situtationroom@mea.gov.in असा असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.