मराठावाडा
दिवसाढवळ्या बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळीबाराची घटना.
बीड | प्रतिनिधी
दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. जिल्हाधिकारी परिसरातील मुद्रांक कार्यालयासमोर गोळीबाराची घटना घडली. मुद्रांक कार्यालयासमोर जमीन खरेदी-विक्रीतून वाद झाला. या वादानंतर गोळीबार झाला.
या गोळीबारात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत. नेमके कारण काय? याचा शोध पोलीस घेत असून घटनास्थळी पोलीस अधीक्षक आर. राजा आणि अधिकारी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळाचा ताबा पोलिसांच्या पथकाने घेतला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.या गोळीबारात सतिश बबन क्षीरसागर (लक्ष्मण नगर, बीड), फारूक सिद्दीकी (जालना रोड, बीड) हे दोघे जखमी झाले आहेत.