जालना जिल्हा

जालना जिल्ह्यातील इतके विद्यार्थी अडकले युक्रेनदेशात

images (60)
images (60)

न्यूज जालना ब्युरो

रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला चढवला असून युक्रेनची राजधानी कीवसह इतर शहरांना वेढा घातलाय. या युद्धाचा फटका अप्रत्यक्षरित्या संपूर्ण जगाला बसत असून भारतातील सुमारे 20 हजार विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकल्याच समोर येत आहे. यामध्ये मराठवाड्यातील 57 तर जालना जिल्ह्यातील 7 विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने आवाहन केल्यानंतर जालना जिल्ह्यातील सात विद्यार्थ्यांच्या पालकांनी युक्रेनमध्ये शिकत असलेल्या आपल्या मुलांच्या सुटकेसाठी जिल्हा प्रशासनाला अर्ज केल्याच आज निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी सांगितलय.


जालना जिल्ह्यातील सात विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. जालना शहरातील स्वप्नील जगदेव घुले, मानवी चेतन खंडेलवाल आणि किरण तारा भंडारी तर टेंभुर्णी येथील सुयोग शंकर धनवई, संकेत दिनकर उकिरडे, तेजस गणेश पंडित आणि शुभम गणेश पंडित अशी या विद्यार्थ्यांची नाव आहेत. हे विद्यार्थी युक्रेनमधील वेगवेगळ्या विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत असून वेगवेगळ्या चार शहरात अडकल्याचे समोर आले आहे. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या मुलांच्या सुटकेसाठी अर्ज दाखल केले आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!