जालन्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन कामगार गंभीर
जालना प्रतिनिधी
पहा विडिओ
https://youtube.com/shorts/76igfu8N-mE?feature=share
जालना शहरातील मामा चौक परिसरातील हॉटेल विजय विलास एका निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून तीन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. अचानक स्लॅब कोसळल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरवात केली . दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगाराना तातडीने खाजगी दवाखान्यात हलवले आहे .आणखी कोण कोण यात दबलेले आहेत की नाही याचा शोध पोलीस घेत आहेत
बाहेर काढण्यात आलेल्या मजुरात मुनव्वर अकबर शेख वय वर्ष 37,राहणार मिल्लत नगर,अरुण शेख मुनीर,वय वर्षे 41 , राहणार मिल्लत नगर, आणि याकुब शेख शेख पाशु, वय वर्ष 35, राहणार दुखी नगर, अशी या कामगारांची नावे आहेत.
यापैकी याकुब शेख शेख पाशु हा सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. तर बाकी सर्वांची प्रकृती धोक्या बाहेर आहे अशी माहिती पोलिसानी दिली. पोलिसानी जखमी मुजराचा जबाब नोंदवला असून स्थळ पंचनामा आणि पुढील कारवाई सध्या सुरू आहे.