अंबड तालुका

वडीगोद्री येथे पिकअप पलटी होऊन अपघात; २० जखमी

वडीगोद्री ( जि . जालना ) : पिठोरी सिरसगाव ( ता.अंबड ) येथील एका कुटुंबातील पिक अप वाहनाला वडीगोद्री येथे शनिवार ता .अंबड दि १२ रोजी दुपारी अपघात होऊन वीस नागरिक जखमी झाले आहेत .

images (60)
images (60)

या विषयी माहिती अशी की , येथील मुस्लिम समाजातील एका मुलीचा विवाह सोहळा निपानी पोखरी ता . गेवराई येथील मुला सोबत शुक्रवार ता .११ रोजी पिठोरी सिरसगाव येथे पार पडला .

शनिवार ता .१२ रोजी हे ओलिमासाठी लहान मुलासह महिला पुरुष निपाणी पोखरी ता . गेवराई जिल्हा बिड येथे बोलोरो पिकअप एम एच . २१ एक्स ८१७८ या वाहनातून जात असतांना वडीगोद्री जवळ हुलकणी बसल्यामुळे पिक अप पलटी होऊन या मध्ये जवळपास २० ते २५ जखमी झाले . या मधील ०३ जणांची प्रकृती गंभीर असुन यांना जालना येथे हलवण्यात आले आहे . जखमीवर वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सुशिल जावळे यांनी उपचार करून रुग्णांना १०२ व १०३ रुग्णवाहिकेने अंबड ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे .

– जखमीचे नावे हबीब सय्यद ( ६५ ) रा . पिठोरी सिरसगाव , अल्फीया नबी सय्यद ( १२ )

रा . पिठोरी सिरसगाव , अरबास सल्लाओद्दीन शेख ( १५ ) रा . दाढेगाव , मोसिम नबी सय्यद ( १२ ) रा.पिठोरी सिरसगाव , हुसेन हबीब सय्यद ( ४३ ) सिरसगाव , तनविर हुसेन सय्यद ( १६ ) पिठोरी सिरसगाव , गफार तांन्हु शेख ( ६२ ) रा . दाढेगाव

रीहान हुसेन सय्यद ( ३८ ) रा . पिठोरी सिरसगाव , आदील शेख ( १० ) रा . गेवराई , ईरफान शेख ( ११ ) रा . औरंगाबाद , रहीमोद्दीन गफार शेख ( ३४ ) रा . दाढेगाव , फरजान रहीमोद्दीन शेख ( ३४ ) रा . दाढेगाव , सना रहीमोद्दीन शेख ( १४ ) रा . दाढेगाव , कुलसुम गफुर शेख ( ५५ ) दाढेगाव , शोहेल शेख ( १२ ) औरंगाबाद , आलीशान । रशिद सय्यद ( ५१ ) रा . मातोरी , मेहमुदा हबीब सय्यद ( ५२ ) रा . पिठोरी सिरसगाव , सिमरत रफिक शेख ( २५ ) जातेगाव , रीजवान महेमुद सय्यद ( ३० ) रा . रामगव्हान , सिमरत शाकील शेख , ( २३ ) रा.जातेगाव ता.गेवराई , रामु आटोळे पिठोरी सिरसगाव

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!