अंबडमध्ये वीस वर्षीय तरुणाचा खून ;अंबड शहर बंद, कारवाईची मागणी
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील होळकरनगर येथील वीस वर्षीय तरुण रामेश्वर अंकुशराव खरात वय 20 वर्षे याला दहा ते पंधरा संशियतानी शुल्क कारणावरून लाकडी दांड्याने व लोखंडी रॉडने मारहाण करून शनिवारी ( ता .१२ ) खून केला . याचे पडसात सोमवारी ( ता .१४ ) अंबड शहरात उमटले असून शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे . अंबड शहरातील रामेश्वर खरात याला शुल्क कारणावरून दहा ते पंधरा जणांनी मारहाण केली . यात त्याचा खून झाला . त्यानंतर अंबड तालुका पोलिस ठाण्यात रविवारी ( ता .१३ ) रात्री शेकडो नागरिकांनी ठान मांडून दोषींवर गुन्हा नोंद करावा . तसेच आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली होती .
विहीरीवर पोहण्याच्या ठिकाणी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरुन एका २० वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड व लाकडी दांडयाने दि . १२ रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी अंबड येथे जमाव जमवून जबर मारहाण केल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
खून झाल्याची माहिती परिसरात पसरताच अंबड पोलीस ठाण्यात शेकडो लोकांचा जमाव जमा झाला होता . पोलीस अधीक्षक विनायक देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे यांनी जमावाला समजावून सांगून आरोपीना ताबडतोब अटक करण्यात येईल . असे आश्वासन दिल्याने जमाव पांगला .
मयत रामेश्वर अंकुश खरात यांच्या खुनाच्या निषेधार्थ व्यापारी महासंघ तसेच ग्रामस्थांच्या वतीने आज दि .१४ मार्च रोजी अंबड शहरातील संपूर्ण बाजार पेठ बंद ठेवण्यांत आली . आणि अंबड मध्ये शांततेत फेरी काढून आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली .
याबाबत पोलिसांनी रविवारी रात्री पोलिसांनी सहा ते सात संशियताना ताब्यात घेतले . मात्र , या घटनेची निषेधार्थ सोमवारी शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली होती . या प्रतिसाद देत सोमवारी अंबड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले . शिवाय तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन ही देण्यात आले . दरम्यान शहरातील हॉस्पिटल , मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद होती . शहरातील चौकाचौकात अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील , सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .