जालना क्राईम

सेवली हद्दीतील मोहाडी येथे खून ?

जालना /प्रतिनिधी

images (60)
images (60)


सेवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहाडी (ता. जालना) येथील माजी सरपंच आणि तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष छबु घासू राठोड यांचा संशयास्पदरित्या मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे. त्यांचा खून करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे. राठोड हे रात्री आपल्या घराच्या अंगणात खाटेवर झोपलेले होते.

आज सकाळी त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला आहे.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या घटना वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!