भारतभ्रमण करणाऱ्या दाम्पत्याचे जालन्यात वैष्णव-बैरागी समाजाच्या वतीने स्वागत
जालना /प्रतिनिधी
गुजरातमधील जामनगर येथील 60 वर्षीय बकुलेशचंद्र गोपालदासजी निंबार्क (वैष्णव) आणि त्यांच्या पत्नी कामाक्षीदेवी हे 6 ऑक्टोबर 2021 पासून या एक्टिवा स्कुटीवरून भारत भ्रमणावर असून ते ठिकाणी भारतीय धार्मिक स्थळांची जनजागृती करत आहेत. पर्यटन स्थळांना भेटी देणे व जी धार्मिक स्थळांना भेटी देऊन भारतीय संस्कृती आणि अध्यात्मिक कथा जोपासण्याचा संदेश देत आहेत. हे दांपत्य आज जालन्यात पोहोचल्यानंतर वैष्णव-बैरागी समाज बांधवांच्यावतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती रवींद्र बैरागी यांनी दिली. कुंभार गल्लीत हा स्वागत समारंभ पार पडला. यावेळी वैष्णव समाजाचे अध्यक्ष कैलासदास वैष्णव, बैरागी समाज अध्यक्ष ओमप्रकाश दास वैष्णव, पुरुषोत्तमदास वैष्णव, चरण महाराज वैष्णव, सुरेशदास वैष्णव, मनोजदास वैष्णव, रवींद्रदास बैरागी, राजेंद्रदास वैष्णव, रामप्रसाद बैरागी, विजयदास वैष्णव, कैलासदास वैष्णव, मानसदास वैष्णव, ममता कैलाशदास वैष्णव, हर्ष पंकजदास वैष्णव, पूजा निखिलदास वैष्णव, उर्मिला राजेंद्रदास वैष्णव, सारिका रविंद्रदास वैष्णव आणि समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.