जालना जिल्हा

अंबड घनसावंगी तालुक्यातील ऊसाचा प्रश्न अतिशय गंभीर -सतिश घाटगे पाटील

जालना: अंबड घनसावंगी तालुक्यातील ऊसाचा प्रश्न अतिशय गंभीर झाला असून जवळपास 5.00 लक्ष मे.टन ऊस अतिरीक्त आहे .

images (60)
images (60)

त्यामुळे फक्त शेतकरीचा नव्हे तर कारखानदारही हवालदिल झाले असून यावर तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत . अतिरीक्त ऊस असलेलया कारखान्यांनी कनार्टक सोलापूर भागात मराठवाड्यातील गेलेली ऊस तोडणी मजुर व वाहतूक यंत्रणा फेब्रुवारी 2021 अखेर आपलयाकडे घेवून अतिरीक्त ऊस तोडून जिल्हयाबाहेरील दुस – या साखर कारखान्यांना नेवून गाळप करण्याचे नियोजन केले होते .

परंतु परराज्यातून येणारे मराठवाड्यातील मजुर लातूर , सोलापूर , उस्मानाबाद व इतर अतिरीक्त ऊस असलेलया कारखान्याकडे वळले असून जालना व औरंगाबाद जिल्हयातील साखर कारखान्यांचे अतिरीक्त ऊसाबाबतचे सर्व नियोजन कोलमडले असून ऊस तोडणी अभावी शेतक – यांचा ऊस शेतात उभा राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे . वाढत्या ऊन्हामुळे ऊसांचे वाढे वाळून जात असून ऊस तोडणी मजूर शेतक – यांकडे पैशांची अवास्तव मागणी करीत आहेत . ही वस्तूस्थिती असून अंबड घनसावंगी तालुक्यातील अतिरीक्त ऊस इतर कारखाने घेवून जातील असे नियोजन जरी केले तरी एप्रील मे महिण्यात ऊन्हामुळे ऊस तोडणी मजूरांची कार्यक्षमता घटत आहे . आपलया हातात पुढील 60 ते 70 दिवस असून अंबड घनसावंगी कार्यक्षेत्रातील उसासाठी घृष्णेश्वर साखर कारखाना जिलहा औरंगाबाद येथे जवळपास 2000 मे टन प्रतिदिन ऊस गाळप नियोजन करीत आहोत . परंतु ऊस तोड मजुराअभावी अडचण येत आहे . तरी माझी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक – यांना कळकळीची विनंती आहे की इतर कारखाने येवून आपला ऊस घेवून जातील या आशेवर न बसता मालक तोड सुरु करावी . यासाठी घृष्णेश्वर साखर कारखाना वाहने उपलब्ध करून देणार असून त्या सर्व ऊसाची नोंद समृध्दी साखर कारखाना घेणार आहे . तसेच घृष्णेश्वर साखर कारखान्याचे एफ . आर . पी . प्रमाणे ऊसाचे पैसे अदा करण्याची जबाबदारी समृध्दी साखर कारखाना घेणार आहे . तरी मालक तोड करु इच्छित असलेलया शेतक – यांनी समृध्दी साखर कारखान्याच्या शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा . असे आव्हाहन समृध्दी शुगर्स लिमीटेड सतिश घाटगे पाटील यांनी केले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!