जालनात भंगारच्या गोदामाला आग,लाखोंचे नुकसान
जालना :जालना शहरातील दुःखीनगर परिसरात (असलेल्या भंगाराच्या गोदामला बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.
गोदामाला आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी पाण्याची बोर सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
मात्र गोदामात असलेल्या प्लास्टिक, ताडपत्री, पन्नी, पुट्ठा अशा ज्वलनशील भंगार साहित्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. अग्निशमन विभागाला आग लागल्याची माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन बंबाच्या सहायाने तब्बल तीन तास अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. गोदामात असलेले भंगार साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याने भंगार व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे कारण कळू शकले नसते, तरी ही आग उष्णतेमुळे भंगारात असलेल्या ज्वलनशील साहित्याने पेट घेतल्याने लागल्याचा अंदाज अग्निशमन विभागाच्या जवानांनी वर्तविला आहे