जालना जिल्हा

मेडिकल कॉलेजच्या मंजुरीसाठी काँग्रेस व्यापक मोहिम राबवावी ः आ. कैलास गोरंट्याल


जालना (प्रतिनिधी) ः जालना येथे मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळालीच पाहिजे यासाठी काँग्रेस

images (60)
images (60)

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जालना शहरासह मतदार संघातील गावागावात जनजागृती करून व्यापक मोहिम राबवत जनसामान्यांच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी करावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांनी आज येथे बोलतांना केले.


काँग्रेस पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध डिजिटल सदस्य नोंदणीचा आढावा, मराठी नुतन वर्षाच्या निमित्ताने चहापाणी आणि येत्या 9 एप्रिल रोजी जालना विधानसभा मतदार संघाचे आ. कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी आज शनिवारी सकाळी येथील महेश भवन मध्ये जालना शहर व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत, जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव, माजी न. प. गटनेते गणेश राऊत, माजी सभापती महाविर ढक्का, जगदिश भरतीया, नंदाताई पवार, संगीता पाजगे यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.


यावेळी पुढे बोलतांना आ. गोरंट्याल यांनी काँग्रेस पक्षातर्फे सुरू असलेल्या डिजिटल सदस्य नोंदणीबाबत नाराजी व्यक्त करून सदस्य नोंदणीसाठी येत्या 15 एप्रिल पर्यंत मुद्दतवाढ पक्षश्रेष्टींनी दिली आहे. या कालावधीत जालना शहर व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवकांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे आवाहन करून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जालना येथे खाजगी तत्वावर मेडिकल काँलेजला मंजुरी देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र आपण त्यांचा हा प्रस्ताव अमान्य करून जालना येथे शासकीय मेडिकल कॉलेज मंजुर करण्याची आग्रही मागणी केली आहे. जालना येथे राज्य शासनाने मेडिकल कॉलेजला मंजुरी द्यावी यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरी भागासह मतदार संघातील प्रत्येक गावात व्यापक जनजागृती राबवून मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळण्यासाठी मोठी चळवळ उभारावी. यासाठी डॉक्टर, वकील, प्राध्यापक, उद्योजक, व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळींची एक कृती समिती गठीत करून या समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात जालन्यात लोकशाही पध्दतीने आंदोलन छेडावे असे आ. गोरंट्याल यांनी यावेळी सांगीतले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत यांनी प्रास्ताविक करतांना कार्यक्रमाची भूमिका विषद केली. त्यानंतर शहराध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, महाविर ढक्का, जगदिश भरतीया, वसंत जाधव आदींनी आपले विचार मांडले. या बैठकीस शहर खडके, रमेश गौरक्षक, हरिष देवावाले, विनोद रत्नपारखे, संजय भगत, विनोद यादव, कृष्णा पडूळ, दत्ता शिंदे, योगेश पाटील, भानुदास राठोड, कलीम खान, पंडित शिंदे, समाधान शेजुळ, मनोहर उघडे, अंजेभाऊ चव्हाण, राधाकिशन दाभाडे, भास्कर मगरे, वैभव उगले, मोहन इंगळे, नारायण वाढेकर, इम्रान खान, शेख शमशुद्दिन, बाळासाहेब शिरसाठ, सय्यद करीम, गणेश तिडके, सुरेश कदम, चंद्रकांत रत्नपारखे, फकीरा वाघ, अरूण घडलिंग, गणेश चांदोडे, दत्ता पाटील आदींची उपस्थिती होती. संचलन राम सावंत यांनी तर शेवटी मनोहर उघडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!