शिवनगाव रस्त्याची दैना कायमच : नविन रस्त्याची लागली वाट
पालकमंत्री साहेब याकडेही लक्ष द्या : वाळू माफियांना अभय कोणाचे!
घनसावंगी प्रतिनिधी :
घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव येथे जवळपास गेल्या दोन दशकांपासून रस्त्यामुळे टाहो फोडणाऱ्या गावकऱ्यांचे साकडे अखेर पालकमंत्री यांनी ऐकून 14 किमी ऐवजी 1400 मीटर रस्त्याची मंजूरी देऊन बोळवण केली मात्र या रस्त्यावर ऊसाची वाहतूक व चोरट्या पद्धतीने चालणारी वाळूची अवैध वाहतूकीमुळे आज नवीनच डांबर टाकून केलेल्या रस्त्यावर रस्ता सुकन्या अगोदरच वाहतूक केल्याने रस्त्याची पार वाट लागली असून शिवनगाव करांचे रस्त्याचे डोहाळे आता कोमेजून जाण्याचे चिन्ह दिसत आहे…..
या रस्त्यावर होणाऱ्या अवैध वाळू वाहतूकीबाबत तहसीलदार यांना सरपंच व गावकऱ्यांनी वेळोवेळी कळवले मात्र ठोस अशी कार्यवाही झाली नसल्याने वाळू माफिया जोरात बेडरपणे आपला अवैध धंदा करताना दिसत आहेत तर पोलीस प्रशासन देखील या माफियांना पाठीशी घालत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले…..….
तसेच या रस्त्याचे काम चालू असतांना ऊस वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी कंत्राटदार यांनी नियोजन करणे गरजेचे होते व रस्त्याचे काम पूर्ण होण्या अगोदर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी नवीन रस्त्यावर काम पूर्ण होण्या अगोदर जड वाहतुकी करायला नको होती तसेच रस्त्याचे काम चांगले करून घ्या असे निर्देश पालकमंत्री यांनी कार्यकर्त्यांना दिले होते मात्र कंत्राटदार महोदयांनी सुद्धा दुतर्फा फंखे भरण्यासाठी मुरूम टाकण्याऐवजी माती मिश्रित मुरूम टाकून व पुरेशी डांबर – खडी न टाकता रस्त्याच्या कामात कुचराई केल्याचे दिसत आहे तर गावकऱ्यांतुन या कामाची चौकशी करून वाळूची वाहतूक बंद करण्यासाठी रावटी पथक ठेवण्याची मागणी होत आहे…….