जळगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे १ मे रोजी विभागीय अधिवेशन !
मुकनायक, जीवनगौरव पुरस्कारासह पत्रकारांना होणार विमा वितरण
जळगाव,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशन दि.१ मे रोजी जळगाव येथील नियोजन भवन येथे होणार असून यावेळी मुकनायक पुरस्कार, जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. प्रथमच जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांचा २ लाखाचा अपघात विमा काढण्यात आला असून विमा वितरणही करण्यात येणारं आहे.तर वृत्तपत्रांचे अर्थकारण या विषयावरील चर्चाही होणार आहे. तरि पत्रकार बांधवानी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशनास उदघाटक म्हणून प्रमुख राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे तर प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार संघांचे राज्यसंघटक संजय भोकरे असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन, माजी मंत्री गुलाबराव देवकर,महापौर सौ. जयश्री सुनील महाजन,महाराष्ट्र स्टुडन्ट युनियनचे राज्य संस्थापक अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे, आ. सुरेश दामू भोळे,जिल्हाधिकारी अभिजित राउत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे,श्री राजपूत करणी सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रविण पाटील, पत्रकार संघांचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, मनोकल्पचे संचालक मनोज वाणी,मंगलग्रह संस्थांनचे अध्यक्ष डिगंबर महाले सर,आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.कार्यक्रमाला जालना जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांनी केले आहे.
अशी असेल अधिवेशनाची रूपरेषा…
सकाळी १० वाजता अधिवेशनाचे उदघाटन होऊन कार्यक्रमाला सुरवात होईल. प्रथम सत्रात पुरस्कार वितरण व प्रातिनिधिक स्वरूपात पत्रकार बांधवाना विमा वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. सकाळच्या सत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. दरम्यान १ ते २ वाजेदरम्यान भोजन वेळ असेल. त्यानंतर दुपारचे सत्र ठीक २ वाजता सुरु होऊन ५ वाजेपर्यंत असेल, यादरम्यान वृत्तपत्रांचे अर्थकारण व पत्रकारितेचे बदलते स्वरूप व आव्हाने या विषयावर प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांचा पत्रकारांशी थेट संवाद होईल. संघटनेच्या वतीने ठराव पास करण्यात येतील, मान्यवरांचे मनोगत व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणारं आहे.