महाराष्ट्र न्यूज

आवश्यक वाचा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले हे संकेत

मुंबई :काही दिवसांपूर्वीच राज्यातली कमी होणारी रुग्णसंख्या पाहून राज्य सरकारने मास्क सक्तीचा नियम शिथिल केला होता . आता मास्क परिधान करणं हे ऐच्छिक असेल , अशी घोषणा राज्य सरकारकडून केली होती . मात्र त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ दिसत आहे .

images (60)
images (60)

त्या पार्श्वभूमीवर निर्बंधांबाबत राज्य सरकार फेरविचार केल्याचे संकेत मिळत आहे . राज्यात शिथिल केलेला मास्क सक्तीचा नियम पुन्हा लागू होण्याची चिन्हं आता दिसू लागली आहेत . राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत . माध्यमांशी बोलताना आज राजेश टोपे म्हणाले की , जर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होऊ लागली , तर मात्र मास्कसक्ती पुन्हा लागू करावी लागेल . लसीकरणाचा वेग वाढवणं आणि लहान मुलांच्या लसीकरणासाठी आवश्यक ते सर्व उपाय करणं , हे लक्ष्य असल्याचे राजेश टोपेंनी यावेळी सांगितले . दरम्यान , राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याचे संकेतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत . राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली . पुन्हा मास्क वापरायला सांगायचं की नाही , याबद्दलही चर्चा झाली . सध्या लोकांना मास्क वापरायचं आवाहन करत आहोत , पण मास्क वापरणं ऐच्छिकच आहे . याबाबत टास्क फोर्स आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत . जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढत राहिलं आणि टास्क फोर्सनं सूचना दिल्या तर काही निर्बंध लागू करावे लागतील , असं अजित पवार म्हणाले आहेत .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!