….गॅस दरात पुन्हा वाढ
मुंबई :- देशात एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे . आज परत गॅस दरात वाढ झाली आहे . आता १९ किलो गॅस टाकीसाठी जास्त पैसे मोचावे लागणार आहे .
व्यवसायिक एलपीजी गॅसच्या दरात 102.50 रुपयांची वाढ झाली आहे . यामुळे 19 किलोचा गॅस सिलेंडर आता 2355.50 रुपयांना मिळणार आहे . त्यामुळे व्यवसायिाकांच्या खिशाला कात्री लागणार आहे . हे भाव 1 मे पासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत .
दरम्यान 19 किलोच्या गॅस टाकीसाठी याआधी 2253 रुपये लागत होते . या भाववाढीनंतर आता यासाठी 2355.50 रुपये मोजावे लागणार आहेत . 5 किलोच्या एलपीजी गॅस टाकीसाठीही आता 655 रुपये मोजावे लागणार आहे . त्यामुळे घरगुती गॅससहीत व्यावसायिक गॅसमुळेही आता खिशाला कात्री लागणार आहे . यापूर्वी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजीची किंमत प्रती सिलेंडर 250 रुपयांनी वाढवून 2,253 रुपये केली होती . तर 1 मार्च रोजी व्यावसायिक एलपीजीच्या दरात 105 रुपयांची वाढ केली होती . या वाढीनंतर आता 102.50 रुपयांची वाढ झाली आहे . दरम्यान घरगुती गॅसच्या किंमती वारंवार वाढल्यामुळे सामान्यांना फटका बसला आहे . पेट्रोल , डिझेल आणि गॅसच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत . त्यामुळे सामान्यांना या महागाईचा सामना करावा लागत आहे . घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली नाही . मात्र देशातील वेगवेगळ्या भागात घरगुती गॅसचे भाव वेगवेगळे आहेत . सध्या 14 किलोच्या घरगुती विनाअनुदानित गॅससाठी 940 ते 970 रुपये मोजावे लागत आहेत . घरगुती गॅसच्या किंमती न वाढल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे .