जालना क्राईम

जालन्याच्या नवरा बायकोनं पोलिसांची उडवली झोप; दुसरी पत्नी अन् मुलीची हत्या

जालना: कौटुंबिक वादातून पतीने पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीसह तिच्या लेकीची डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना जालना शहरातील (Jalna City) सोनलनगर भागात घडली आहे. 36 वर्षीय भारती सातारे असं हत्या झालेल्या आईचं नाव असून 17 वर्षीय वर्षा सातारे असं मुलीचं नाव आहे. या दोघी-मायलेकींचे मृतदेह आज सकाळी राहत्या घरात आढळून आले. (Jalna Crime News)

images (60)
images (60)

मयत भारती सातारे यांचे पती गणेश सातारे यांना दोन पत्नी असून कौटुंबिक वादातून हे खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मयत महिलेच्या पतीसह त्याच्या पहिल्या पत्नीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!