जालना जिल्हा

काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी दुर करणे नेत्यांची जवाबदारी ः मा. आ. नामदेव पवार

काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी दुर करणे
नेत्यांची जवाबदारी ः मा. आ. नामदेव पवार
जालना (प्रतिनिधी) ः काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नाराजी असेल तर ती दुर करणे नेत्यांची जवाबदारी आहे, असे केल्यास जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष संघटना मजबुत झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन जालना जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा प्रभारी मा. आ. नामदेव पवार यांनी केले.

images (60)
images (60)


जालना जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारणीची महत्वाची बैठक आणि नवनियुक्त जिल्हा प्रभारी श्री पवार यांच्या सत्काराचे आयोजन शनिवार रोजी हॉटेल मधुबन येथे करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते. पुढे बोलतांना श्री पवार म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठी संधी आहे. आतापासूनच कार्यकर्त्यांनी तयारीला लागून काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष बनविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी श्री पवार यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.


याप्रसंगी मा. आ. सुरेशकुमार जेथलिया, कल्याण दळे, मोहसिन अहेमद, सत्संग मुंढे, राजेंद्र राख, शेख महेमूद, राहुल देशमुख, विमलताई आगलावे यांनी बैठकीस मार्गदर्शन केले. प्रास्ताविक करतांना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सांगीतले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. पक्षश्रेष्ठीने त्यांना पाठबळ दिले तर निश्चितपणे काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात मोठे यश मिळेल यात तिळमात्रही शंका नाही. नवे आणि जुने कार्यकर्त्यांची फौज संघटीत करून प्रत्येक तालुक्यात नव्या जोमाने काम करण्यासाठी नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन श्री देशमुख यांनी या बैठकीत केले.


यावेळी ज्ञानेश्वर भांदरगे, ॲड. विनायक चिटणीस नवाब डांगे, एकबाल कुरेशी, अंकुश राऊत, बासेद कुरेशी, राजेश काळे, ॲड. राम कुऱ्हाडे, वसंत जाधव, त्र्यंबक पाबळे, निळकंठ वायाळ, बाबासाहेब गाडगे, विठ्ठलसिंह राजपुत, रामप्रताप खरात, संभाजी गुढे, शेख शमशुद्दीन, जावेद बेग, नारायण वाढेकर, आनंद लोखंडे, अ. रफीक, अण्णासाहेब खंदारे, भाऊसाहेब सोळंके, लक्ष्मण म्हसलेकर, सुभाष मगरे, मुफ्तार खान, सय्यद करीम बिल्डर, चंदाताई भांगडीया, शितल तनपूरे, नंदाताई पवार, मंदा पवार, चंद्रकांत रत्नपारखे, बाबासाहेब सोनवने, कृष्णा पडूळ, शेख इब्राहिम, बाळासाहेब सिरसाठ, अजिम बागवान, गणेश चांदोडे, सुरेश बोरूडे, शिवाजी वाघ, रहिम तांबोळी, सलिम काजी, कलीम खान आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले तर अण्णासाहेब खंदारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!