जालना जिल्हा

प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेतून सौरपंपासाठी अर्ज करताय तर हे वाचा !

प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेतून सौरपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन

images (60)
images (60)

 

    जालना दि. 20 :– प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतक-यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशांपासून सावध राहा.

       महाऊर्जा विभागीय कार्यालयांतर्गत येणा-या औरंगाबाद, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या फसव्या संदेशांबद्दल सायबर सेल मध्ये तक्रारी केल्या आहेत. त्यात काही बनावट  संकेतस्थळ, मोबाईल ॲप तसेच दुरध्वनी आणि भ्रमणीध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी अर्ज करण्यास व नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची किंमत ऑनलाइन भरणा करण्यास सांगितले जात आहे. अशा खोट्या, संकेतस्थळासह मोबाईल ॲपला प्रतिसाद देऊ नका, तसेच फसव्या दुरध्वनी आणि भ्रमणध्वनीवरील प्रलोभणांना बळी पडू नका, अश्या संकेतस्थळावर, ॲपवर ऑनलाईन पध्दतीने पैसे भरु नका, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे.

     ‘ प्रधानमंत्री कुसुम योजना’ शासनाच्या महाऊजा्र विभागामार्फत राबवण्यात येत आहे या योजनेच्या सविस्तर माहितसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावरच भेट द्यावी. अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय, सिटी सर्व्हे न 11149, तिसरा मजला, साई ट्रेड सेंटर, रेल्वेस्टेशन रोड, औरंगाबाद फोन नंबर 0240 – 2653595 ईमेल- domedaabad@mahaurja.com  येथे संपर्क साधावा, असे आवाहनही रोडे यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!