राजकारण

मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नाही,नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे …

मुंबईः  मी मुख्यमंत्रीपदासाठी नालायक हे समोर येऊन सांगा, मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो. आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवेल. मी माझ्या राजीनाम्याचं पत्र लिहून ठेवलंय आहे.
शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार असल्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

images (60)
images (60)

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. राज्यातील राजकीय  पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे.

ठाकरे म्हणाले, माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे मी लोकांना भेटू शकलो नाही. शिवसेना हिंदुत्वापासून दूर होणार नाही. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेंकाना गुंफलेले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही, असे सांगता.

पण बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षाने तुम्हाला काही तरी दिले आहे. शिवसेनेचे आमदार गायब आहेत. आमदार सुरत, गुवाहाटीला  घेऊन गेले आहे. कालपर्यंत विधानपरिषदेची निवडणूक झाली. जबाबदारी जिद्दीने शिवसेनाप्रमुख दिलेले वचन पूर्ण करणार आहे.

कोणताही अनुभव नव्हता. शरद पवारांच्या आग्रहाखातर ही जबाबदारी मी घेतली. पवार, सोनिया गांधी विश्वास टाकला. कोणताही अनुभव नसलेले माणूस इकडे बसविले. पण माझ्याच लोक माझ्यावर विश्वास टाकू शकले नाही. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नसावे, सरळ समोर येऊन सांगा, तुम्ही मुख्यमंत्रिपदी नालायक आहे.

आज संध्याकाळापासून मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवेल, मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवलंय आहे. मी मुख्यमंत्री नको, कोणी चाललेल समोर येऊन सांगा. तुम्ही या फोन करा, तुम्ही फेसबुक लाइव्ह पाहिलेच आहे. 

तुम्हाला संकोच वाटत, संपर्क करून सांगा, या क्षणाला मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पद येत असत. पद जात असत. शिवसैनिकने सांगावं मी शिवसेना प्रमुख राहणार नाही, असे ही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!