जालना जिल्हाराजकारण

सतीश घाटगे पाटील यांचा पुन्हा भाजपात प्रवेश !

व्हिडिओ बातमीसाठी


जालना :

images (60)
images (60)

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा पक्ष यांची शिंदे सेना सोबत युती असतानाही घाटगे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याने त्यांना भाजपा पक्षातून निलंबन करण्यात आले होते .

काही काळ घाटगे यांनी विश्रांतीनंतर भाजपचे घनसावंगी विधानसभेचे प्रमुख सतीश घाटगे यांनी पक्षश्रेष्ठीच्या सुचनेनुसार आणि कार्यकर्त्याच्या विनंतीनुसार भाजपात प्रवेश केला. शनिवारी राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रभारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. पक्षाच्या उद्दिष्टांसाठी आणि घनसावंगी विधानसभेतील जनतेच्या प्रगतीसाठी योगदान देण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा व घनसावंगी विधानसभेत भाजपला मजबूत आणि बळकट करण्याचा संकल्प सतीश घाटगे यांनी केला आहे . यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, संजयजी केणेकर, मंत्री अतुल सावे, आमदार विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!