भोकरदन तालुकामराठावाडा

दहा दिवस संसार करुन पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या नववधुला अटक,

नववधु ही दोन लेकराची आई असुन,पैशासाठी केला होता विवाह

images (60)
images (60)

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन तालुक्यातील तालुक्यातील सोयगाव देवी येथील तरुणाला येथिल तरुणाकडुन २ लाख रुपये घेऊन विवाह आणि दहा दिवस संसार केला व नंतर परत आपल्या पहिल्या पती व आई वडिलांकडे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नववधूला भोकरदन पोलिसांनी अटक केली आहे . याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .विवाह करणारी महिला चक्क दोन मुलींची आई असल्याचा प्रकारही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे .

भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील रावसाहेब भाऊसाहेब सहाणे ( २५ ) हा तरुण नेवासा येथील खाजगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करीत आहे.गावाकडे मुली मिळत नसल्यामुळे नातेवाईकाने रमेश शेळके याच्या मध्यस्थीने रावसाहेबच्या लग्नासाठी एक मुलगी पहिली,सदरील मुलीचे नाव सोनी वानखेडे असुन आश्रमात राहते. व तिला विवाहासाठी २ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.मुलगी मिळत नसल्याने रावसाहेबचे नातेवाईक यास तयार झाले.
त्यानंतर ,२४ जून रोजी वाडी येथील गणपती मंदिरात रावसाहेबचा विवाह सोनी वानखेडे हिच्या सोबत झाला.यावेळी मुलीची आई,मामा,रमेश शेळके,त्याची पत्नी,त्याचा आळंद येथे राहणारा भाऊ,गजू,आशाबाई यांची उपस्थिती होती.लग्नानंतर त्यांना ठरल्याप्रमाणे २ लाख रुपये देण्यात आले.रावसाहेब आणि नातेवाईक त्यानंतर नववधूसह सोयगाव देवी येथे आले.आणि गावातील भाऊबंदांच्या उपस्थितीत पुन्हा २५ जून रोजी बेलोरा शिवारातील देविदास बाबा यांच्या मठावर सोनी वानखडे व रावसाहेब यांचा दुसऱ्यांदा विवाह लावण्यात आला . यावेळी उपस्थितांना जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती.दरम्यान,सोनी एकदा माहेरी जाऊन आली.परत आल्यानंतर तिने रावसाहेबला मी पुन्हा एकटीच माहेरी जात आहे असे सांगितले.६ जुलै रोजी भोकरदन बसस्टँडवर रावसाहेब सोनीला घेऊन आला.तेव्हा तिथे तिचा प्रियकर उपस्थित होता.हे बघूण रावसाहेबने कोण आहे विचारणा केली असता सोनी ने उडवाउडवीचे उत्तर दिले,रावसाहेबला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रावसाहेबने भोकरदन पोलीस ठाणे गाठले . सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या सोनीने सपोनि रत्नदीप जोगदंड,सपोनि राजाराम तडवी यांनी कसून चौकशी केली असता आम्ही पैसे घेऊन लग्न करुन रावसाहेब व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक केल्याची कबुली दिली . रावसाहेब सहाणेच्या तक्रारीवरून सोनी वानखडे हिच्यासह नऊ जणांवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनी वानखडे हीला अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक म्हणजे,लग्नातील आई,मामा हे बनावट होते.तसेच सोनी वानखेडेचा पूर्वी विवाह झाला आहे. तिला दोन मुली आहेत.तिचे माहेर वाशीम जिल्ह्यातील मालेगाव असून पहिल्या पतीला हा प्रकार माहिती नसल्याची माहिती सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी दिली .

हेच ते बनावट नववधुचे मामा..
हीच ती नववधुची बनावट आई

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!