जालना क्राईम

जालना:दोन गटातील तुंबळ हाणामारी नियंत्रणात आणण्यासाठी एपीआयचा हवेत गोळीबार

दोन गटातील हाणामारीत तीन जण गंभीर जखमी

images (60)
images (60)

जालना प्रतिनिधी

औरंगाबाद रोडवरील नागेवाडी शिवारातील बंद पेट्रोलपंपाजवळील घटना आज सांयकाळी 5.45 वाजेच्या सुमारास नागेवाडी येथील बुद्ध विहारासमोर असलेल्या बंद पेट्रोल पंपाच्या जागेजवळ वाघुंडे आणि वाळके यांच्या गटात तुंबळ हाणामारी सुरू होती.या हाणामारीत काठ्या, कुऱ्हाडी, कुदळ, फावडे, लोखंडी सळया याचा सर्रास वापर सुरू होता. ही तुंबळ हाणामारी सुरू असताना जालना येथून पोलीस अधीक्षक कार्यालयातून बैठक आटोपून बदनापूरकडे जात असलेले सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड हे जात होते. यावेळी श्री. रामोड यांनी क्षणाचाही वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला, मात्र कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.परीस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच श्री. रामोड यांनी आपल्याजवळील सरकारी पिस्तूलातून हवेत गोळीबार केला.यावेळी घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना तातडीने पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सपोनि. संदीप सावळे हे रुग्णालयात जखमीचे जवाब नोंदवित असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!