जालना जिल्हा

मोफत अस्थिरोग आणि हाडाचा ठिसूळपणा तपासणी आणि उपचार शिबीर


जालना – भारतीय अस्थिरोग दिनाच्या निमित्ताने दिनांक 2ऑगस्ट 2022 रोजी सिगेदार हॉस्पिटल जालना येथे भव्य मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी आयोजित करण्यात येणारे शिबीर मागील दोन वर्ष कोरोना च्या संकटामुळे आयोजित करता आले नव्हते. यावर्षी कोरोना संबधी सर्व नियमांचे पालन करून सदरील शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

images (60)
images (60)


शिबिराची वेळ सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत असून अस्थिरोग, संधिवात, मणक्याचे आजार, चिकनगुनिया आणि कोरोना नंतर होणारा संधीवात , लठ्ठपणा, जीवन शैली मुळे होणारे आजार, गुडघे दुखी इत्यादी आजारावर तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत. तसेच हाडाचा ठिसूलपना तपासणी (BMD), BMI आणि इतर तपासन्या सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.
डॉ. प्रकाश सिगेदार आणि त्यांची टीम रुग्णांची तपासणी आणि उपचार तसेच मार्गदर्शन करणार आहेत.
सदरील कार्यक्रम दिनांक 2ऑगस्ट 2022, मंगळवारी सकाळी 10ते 2 वाजेपर्यंत सिगेदार हॉस्पिटल, नगर परिषदेजवळ, रेल्वे स्टेशन -चमन रोड जालना येथे होणार आहे.
तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रकाश सिगेदार यांनी केले आहे.


नाव नोंदणी साठी संपर्क 9403757210आणि 9404427210.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!