घनसावंगी तालुका

पावसाने उघडीप दिल्याने अंतर मशागतीच्या कामास आला वेग

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतर मशागतीची कामे सुरू केली आहेत.सध्या शेतामध्ये शेतकरी औषध फवारणी, कोळपणी व इतर कामे करताना दिसत आहे.
मध्यंतरी मागील दहा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच होती.यामुळे शेतातील कामे ठप्प झाली होती.मात्र,या रिपरिप पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाला आहे.मंगळवार (दि.१९) पासून पावसाने उघडीप घेतली आहे.त्यामुळे शेतातील पिकांना खत घालणे, खुरपणी,कोळपणी,औषध फवारणी,अशा इतर कामांना आता वेग आला आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व महिला सध्या शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!