लोकांच्या समूहातून वाचवला सापाचा जीव सर्पमित्र दीपक चांदर यांनी दिले धामण जातीच्या सापास जीवनदान

घनसावंगी/- घनसावंगी येथील बस स्थानक परिसरात एका टाटा एस या चारचाकी माल वाहू वाहनांमध्ये अचानक एक साप घुसला व त्यामुळे सर्वांची धांदल उडाली बस स्थानक परिसर म्हणजे नेहमी लोकांनी गजबजलेला असतो त्याच पद्धतीने आज देखील या परिसरात सदरील गाडीमध्ये साप शिरला आहे हे कळतच लोकांचा भला मोठा समुदाय त्या ठिकाणी जमा झाला होता.
अनेकांनी त्या सापास जीव मारण्याचा प्रयत्न केला असता सदरील सापास शेपटी जवळ थोडीशी जखम झाली व त्यास दोन टाके पडले आहेत,असे जखम देखील लोकांनी मारल्यामुळे झाली आहे सर्पमित्र दीपक चांदर यांना ही माहिती मिळतचा त्यांनी त्या गाडीतून धामण जातीचा साप काढून त्यास पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता येथील पशुवैद्यकीय अधिकारी दीपक मंजुळकर व चंद्रकांत साळवे यांच्या मदतीने सदरील धामण जातीच्या सापास दोन टाके देण्यात आले आहेत. व पशुवैद्यकीय अधिकारी दीपक मंजुळकर यांनी सर्पमित्र दीपक चांदर यांना असा सल्ला दिला आहे की जखम झाल्यामुळे या सापास किमान पंधरा दिवस आपण कुठे सोडू नाही तर तो सुरक्षित राहू शकतो सदरील सापास जखम जुळेपर्यंत कुठेही सोडणार नाही याची जबाबदारी सर्पमित्र दीपक चांदर यांनी घेतली असून सदरील सापास पंधरा दिवसाच्या नंतर जखम बरे झाले असल्यास सुरक्षित ठिकाणी सोडतील असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.