देशातील पहिल्या मंडल स्तंभ स्मारकास अभिवादन

वडीगोद्री
अंबड तालुक्यातील दोदडगाव येथे इतर मागासवर्गीय भटके विमुक्त व एसबीसी समूहांच्या जीवनामध्ये ऐतिहासिक व सामाजिक अर्थाने क्रांती करणारा मंडल आयोग लागू दिनानिमित्त देशातील पहिल्या मंडल स्तंभ स्मारक विनम्र अभिवादन करण्यात आले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी मंडल स्तंभ स्मारकावर सर्व जातीसमूहातील नागरिकांनी एकत्र येत सामाजिक न्यायाच्या या स्मारकाला अभिवादन करून ओबीसींच्या राजकीय आरक्षण पूर्ववत मिळवणे आणि ओबीसींचे इतर सामाजिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी संकल्प करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना मंडल स्तंभ स्मारकाचे जनक डॉक्टर नारायण मुंडे यांनी आगामी काळात जातनीहाय जनगणना तसेच ओबीसींना विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आर्थिक निधीची तरतूद जात नियोजन केल्याशिवाय होणार नाही.सर्व सरकारी योजनांमध्ये जातनिहाय जनगणनेच्या निकषावरच आर्थिक तरतूद करण्यात येते.त्यामुळे मंडल स्तंभ स्मारकापासून मागणी असलेल्या जातीनिहाय जनगणना व्हावी,यासाठी आगामी काळात या स्मारकावरून अनेक प्रकारचे आंदोलनात्मक प्रबोधनात्मक असे कार्यक्रम राबविण्यात येतील असा संकल्प करण्यात आला.
यावेळी अभिवादन करण्यासाठी डॉक्टर नारायणराव मुंडे माजी आमदार,मंडल स्तंभ स्मारक समितीचे अध्यक्ष सत्संग मुंडे,गावचे सरपंच ज्ञानेश्वर वाघ,सुघोष मुंडे,शाम मुंडे,हरी अरविंद मुंडे,वामन गीते,नारायण नागरे,अनिकेत मुंडे,बंडू मुंडे,प्रा.डॉ.विजय केंदले,प्रा.प्रमोद चव्हाण,प्रा.विक्रम दहिफळे,अर्जुन भाबड,संजय मुंढे,चत्त्रभुज मुंढे,संतोष साबळे,मच्छिंद्र आगे,रघुवीर गुडे,प्रा.गोवर्धन खेडकर,प्रा.पालवे,प्रा.प्रमोद चव्हाण, प्रा.गिऱ्हे,प्रा.बिक्कड,प्रा.देशपांडे,प्रा. रामपुरे,प्रा.शाजी सहदेवंन,प्रा.शिंदे, छोटे भाई व इतर ओबीसी बांधव उपस्थित होते.