जालना क्राईमजालना जिल्हा
ब्रेकींग | जालन्यात बुलेटवरून आलेल्या अज्ञातांकडून गावठी पिस्तूलातून तरुणावर गोळीबार

परतूर प्रतिनिधी
बुलेटवरून आलेल्या 3 अज्ञातांनी तरुणावर गोळीबार केल्याची घटना परतूर तालुक्यातील हातडी येथे घडली. गोळीबारात एक तरुण जखमी झाला असून डुकरांच्या वाटणीतून हा गोळीबार झाल्याची माहिती समजली आहे.
बुलेटवरून आलेल्या 3 अज्ञातांनी गावठी पिस्तुलातून तरुणावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जीवन जाधव असे गोळीबारीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. परतुर तालुक्यातील हातडी येथे घनसावंगी तालुक्यातील कंडारी परतूर येथील जीवन जाधव नावाच्या व्यक्तीने पाळलेली डुकरे सोडलेली आहेत. आज सकाळी जीवन जाधव हा डुकरांची देखभाल करण्यासाठी हातडीत आला होता. यावेळी बुलेटवरून आलेल्या अज्ञात 3 इसमांनी त्याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.