जालना जिल्ह्यातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा
भाजपाचे ज्ञानेश्वर शेजुळ यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
*जालना जिल्ह्यातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा…*
…………………………….
*शेतीचे संरक्षण करण्यासाठी गरजु शेतकर्यांना अनुदान* *द्या…*
……………………………
*भाजपाचे ज्ञानेश्वर शेजुळ यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *यांच्याकडे मागणी….*
……,……………..,,…….
बबनराव वाघ,उपसंपादक
जालना जिल्ह्यातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा नसता शेतीच्या संरक्षणासाठी काटेरी तारेचे कुंपण करण्यासाठी शेतकर्यांना अनुदान द्या अशी मागणी भाजपाचे जालना जिल्हाउपाध्यक्ष, श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावामध्ये वन्यप्राण्यांनी उदा. रोही, बिबट्या, हरिण, रानडुक्कर, तरस, या वन्यप्राण्यांनी धुमाकुळ घातल्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील पिके उध्वस्त होताना दिसत आहेत.यासंदर्भात श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेतली.यावेळी ग्रामिण भागातील शेतकर्यांच्या अन्य समस्या संदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा झाल्याचे श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी आमच्या प्रतिनिधी बोलतांना माहीती दिली आहे.
जालना जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. सरासरिपेक्षा 50 टक्के सुद्धा शेतीतुन उत्पन्न मिळु शकत नाही अशी भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे.यापुर्वी वन्यप्राण्यांनी अनेक शेतकर्यांच्या गायी, बैल, म्हशी,शेळ्या व मेंढ्या यांना ठार मारले असुन अनेक गावातील माणसावर व स्रियांवर सुद्धा जंगली प्राण्यांनी हल्ले केलेले आहेत. ग्रामिण भागातीव शेतकर्यांना शेतीच्या संरक्षणासाठी रात्रभर जागुन शेतात पहारा द्यावा लागत आहे. व रात्री बे रात्री जागुन शेतकर्यांना अक्षरशः जागरण करावे लागत आहे. दिवसभर शेतात कष्ट करणे व रात्री शेतात रात्रपाळी करावी लागत असल्याने शेतकर्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आजाराचे प्रमाण वाढताना दिसुन येत आहे.
या जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे होणारे नुकसान व होणारी हेळसांड हे शेतकर्यांच्या आत्महत्तेचे मुळ कारण असल्याचे श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणुन दिले आहे.
आपण व आपल्या सरकारने शेतकर्यांसाठी अनेक चांगल्या व लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. शासनाच्या वतीने शेतकर्यांसाठी अनेक चांगल्या योजना मोठ्या प्रमाणावर अनुदान दिल्या जाते.याच धर्तीवर जालना जिल्ह्यातील गरजु शेतकर्यांच्या शेतातील पिकांच्या सरक्षणासाठी व शेतील काटेरी तारेचे कुपन करण्यासाठी शेतकर्यांना 100 टक्के अनुदान द्यावे. अशी आग्रही मागणी भाजपाचे जालना जिल्हाउपाध्यक्ष, श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असुन यासंदर्भात लवकर मंत्रालयात लवकरच वन, महसुल व संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक बोलविणार असुन शेतकर्यांसाठी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगीतले आहे.