शेतकऱ्यांनी विहीत वेळेत ई-पीक पाहणीची नोंद करावी-आ.राजेश टोपे
न्यूज जालना/घनसावंगी प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी विहित वेळेत ई-पीक पाहणीची नोंद करावी असे आवाहन माजीमंत्री आमदार राजेश टोपे यांनी आज दि.(१२) शुक्रवार रोजी तहसील कार्यालय घनसावंगी येथे केले.
तहसील कार्यालय घनसावंगी येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त रक्तदान शिबिराचे उदघाटन आ.राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच मुख्य प्रवेश द्वारावर लावण्यात आलेल्या अभ्यंगतासाठी माहितीपर व्हिडिओची माहिती करून घेतली.अद्यावत व्ही.सी.रूम व महसूल ग्रंथालय याचे देखील उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी तहसील कार्यालयात राबविण्यात आलेल्या विकास कामाचे कौतुक केले व यात वेळोवेळी अद्यावतीकरण करण्याच्या सूचना केल्या.घनसावंगी येथील शेतकर्यां च्या शेतात प्रत्यक्ष जाऊन ई-पीक पाहणी केली व प्रत्यक्ष त्यांना ई-पीक पाहणी मोबाइल वर करून दाखवली.सर्व शेतकरी यांनी विहित वेळेत आपआपल्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी द्वारे नोंद करण्याचे आवाहन यावेळी आमदार राजेश टोपे यांनी या वेळी केले. या प्रसंगी जालना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती कल्याण सपाटे,पंचायत समिती सभापती भागवत रक्ताटे,उपसभापती बन्शीधर शेळके,घनसावंगी नगराध्यक्ष पांडुरंग कथले,तहसिलदार नरेंद्र देशमुख,नायब तहसिलदार गौरव खैरनार,मुख्याधिकारी विक्रम मांडूरके,नंदकुमार देशमुख यांच्यासह नगरसेवक,तहसील कार्यालयातील कर्मचारी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.