जांबसमर्थ येथे पांदण रस्त्याच्या अपूर्ण कामाच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भेंडाळा -जांबसमर्थ या पांदण अपूर्ण कामाच्या या मागण्यांसाठी या पांदण रस्त्यावर आज दि.(१४) रोजी सामाजिक कार्यकर्ते किशोर बाबुराव मुन्नेमाणीक यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी आमरण उपोषण सुरू केले आहे.दरवर्षी ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांची होणारी अडचणी लक्षात घेत भेंडाळा ते जांबसमर्थ या दोन गावांना पांदण रस्त्याचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरु करण्यात आले होते.सुमारे सहाशे मीटर रस्त्याचे काम झाल्याचे सांगितले जात आहे.परंतु लाखो रूपये खर्च करूनही रस्त्याची जैसे थी अशीच परिस्थिती आहे.या उपोषणस्थळी सजाचे तलाठी विजय बुचूडे,पोलीस पाटील भास्कर खाडे,एकनाथ तांगडे,भगवान तांगडे,उद्धव तांगडे उपस्थित होते.या उपोषणात सामाजिक कार्यकर्ते किशोर मुन्नेमाणीक,गणेश तांगडे, बशीर सय्यद,नारायण राऊत, नारायण मोगरे,अर्जुन नाटकर,भिमराव मोगरे,सुभाष राऊत,अजहर सय्यद,मुस्तफा सय्यद,सद्दाम शेख,परमेश्वर वायदळ,आबासाहेब गलबे,सुरेश तांगडे,महिला सागरबाई तांगडे,आशा वाढे,ताहेरा सय्यद,अनिता तांगडे,यांच्यासह आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.
या पांदण रस्त्याच्या अपूर्ण कामासाठी सकाळपासून उपोषण सुरू असून,जोपर्यंत प्रशासनाचे अधिकारी उपोषणस्थळी भेट देऊन या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावत नाहीत.तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा सामाजिक कार्यकर्ते किशोर मुन्नेमाणीक यांच्यासह उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.