घनसावंगी : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचा सामूहिक राष्ट्रीय गीत गायनाने समारोप
न्यूज जालना/घनसावंगी
घनसावंगी येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवाचा बुधवार (दि.१७) रोजी सामूहिक राष्ट्रगायनाने समारोप करण्यात आला. शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र ते महावितरण कार्यालय या परिसरात हा कार्यक्रम पार पडला.यावेळी शहरातील कै. दत्तासाहेब देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,संत रामदास महाविद्यालय,कै. दादासाहेब देशमुख जिल्हा परिषद प्रशाळा, इंग्लिश स्कुल,हाजी अब्दुल रज्जाक उर्दू शाळा,मोडेल डिग्री कॉलेज या शाळेतील विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी उपस्थित तहसीलदार नरेंद्र देशमुख,गटशिक्षणाधिकारी रविंद्र जोशी,नगराध्यक्ष पांडूरंग कथले,उपनगराध्यक्ष, सभापती,सदस्य,राजकीय पदाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षकवृंद कर्मचारी,पत्रकार,पोलीस कर्मचारी,व्यापारी,तरुण सहकारी,शहरातील जेष्ठ नागरिक,नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी आदींनी उपस्थिती दर्शवून सहभाग नोंदवला.