जालना जिल्हा

जालना:स्मार्ट सिटी अंतर्गत माजी सैनिकांची पद भरती

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मनपा औरंगाबाद यांच्याकडून माजी सैनिकांची पद भरती

images (60)
images (60)

जालना, दि. 23 :- औरंगाबाद स्मार्ट सिटी जड वाहन वाहतूक परवाना धारक अनुभवी 20 माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर कम कंडक्टरची निवड चाचणी घेणार असुन सदर निवड प्रक्रिया 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद येथे राबवली जाणार आहे. खालील पात्रता धारक माजी सैनिक उमेदवारांनी वरील तारखेस व वेळेस आवश्यक कागदपत्रांनी (डिस्चार्ज बुकची कॉपी, आर्मी सिविल हेवी व्हेहिकल लायसन्स, आर्मी ग्रॅजुएशन सर्टीफिकेट इत्यादी) सह हजर रहावे.

पात्रता :- ट्रेड : सैन्य दलातील ट्रेड DSV(Spl Vch)/AM-50/Dvr(MT/DMT/DvrGnr/Dvr(AFT)  यापैकी असावा. शैक्षणिक पात्रता: 10वी, 12 वी पास आणि आर्मी ग्रॅजुएट, वैध प्रवासी बस वाहतुक परवाना PSV BUS (TRV-PSV-Bus)  धारकास प्राधान्य, निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच (बिल्ला) निवडीच्या, नियुक्तीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत तयार करावा, सैन्य दलात हेवी व्हेहिकल ड्रायव्हिंगचा किमान 15 वर्षाचा अनुभव आवश्य, मेडीकल कॅटेगिरी SHAPE-1, वय अधिकतम 48 वर्ष,

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय 41, नंदनवन कॉलनी,औरंगाबाद दुरध्वनी क्रमांक – 0240- 2370313. अधिक माहितीसाठी वरील पत्यावर, दुरध्वनी क्रमांकारवर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!