अंबड तालुका

Video:जांब समर्थ येथील मूर्ती चोरीच्या निषेधार्थ भाविक आक्रमक; दैठणावसियांची पायी दिंडी

जालना :
– समर्थ रामदास स्वतः पूजा करत असलेल्या जांब समर्थ येथील राम मंदिरातील प्राचीन पांचधातूच्या मुर्त्या चोरी होऊन सहावा दिवस उजाडला असला तरी पोलिस तपासात काहीच हाती न लागल्यामुळे समर्थ भक्तांमध्ये चांगलाच संताप दिसून येतोय.
मुर्तीचोरीचा निषेध आणि चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा यासाठी दैठणा गावाच्या भाविकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. दैठ्णा ते जांब समर्थ मंदिरापर्यंत भाविकांनी पायी दिंडी काढली. या पायी दिंडीत भाविक मोठ्या संख्येने टाळ मृदंगाच्या गजरात भजन करत सहभागी झाल्याचे पाहायला मिळालं.

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेला ६ दिवस उलटून गेले आहेत . मात्र , अद्यापही पोलिसांच्या तपासाला यश आलेले नाही . याच्या निषेधार्थ तालुक्यातील दैठणा येथील भाविकांनी मूर्ती चोरांचा तत्काळ शोध घेण्याच्या मागणीसाठी श्रीराम मंदिरापर्यंत दिंडी काढली . यावेळी भाविकांच्या संतापाचा कडेलोट झालेला पाहायला मिळाला .

जांब समर्थ येथे समर्थ रामदास स्वामींच्या जन्म ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिरातील हजारो वर्षापूर्वीच्या मूर्ती सोमवारी ( दि . २२ ) पहाटे चोरीला गेल्या आहेत . त्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे . समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी सुमारे १५३५ मध्ये श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली होती . पंचधातुमध्ये असलेल्या या मूर्ती आजही तेजस्वी दिसत होत्या . दरम्यान मंदिर बंद केल्यानंतर मंदिराच्या कुलपाची किल्ली एका ठराविक ठिकाणी ठेवली जाते .

याचाच फायदा घेत चोरांनी राम – लक्ष्मण – सीता आणि पंचायतन असा वस्तू चोरट्यांनी पळवून नेल्या . या घटनेनंतर घनसांवगीचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पाहणी केली होती . प्रथम चोरांनी किल्ली चोरून नेली आणि मूर्ती लंपास केल्या .

यानंतर परत मंदिराला कुलूप लावून परत किल्ली आहे , त्या ठिकाणी ठेवली . या घटनेला ६ दिवस उलटूनही अद्याप पोलिसांना चोरट्यांचा शोध घेता आलेला नाही . त्यामुळे परिसरातील नागरिकांसह भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!