घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

Video: तपास यंत्रणेला गती येणे अत्यावश्यक: मठाधिपती सुरेश महाराज रामदासी

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी

images (60)
images (60)
Video

घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरात समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या पंचधातूच्या सहा मुर्ती चोरट्यांनी सोमवार (ता.२२) रोजी लंपास केल्या आहेत.
चोरी होऊन दहा दिवस होऊनही पोलिसांना अद्याप हाती लागलेला नाही.त्यामुळे भाविकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.मुर्ती चोरीचा निषेध आणि तपास जलगतीने लावावा यासाठी साडेगाव येथील भाविकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ह.भ.प.सुरेश महाराज रामदासी साडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली साडेगाव ते श्रीक्षेत्र जांबसमर्थ पर्यंत गुरूवार (ता.०१) रोजी पायी दिंडी काढण्यात आली.या पायी दिंडीत भाविक टाळ, मृदंग राम नामाचा जयघोष करत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


श्रीक्षेत्र साडेगाव ते जांबसमर्थ पायी दिंडी जांबेत दाखल
जांबसमर्थ : श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील मंदिरातील मूर्त्यांच्या चोरीला दहा ते बारा दिवसांचा कालावधी उलटला असतांना सुद्धा पोलिसांना तपासात कुठलाच पुरावा हाती लागला नाही. पोलिस प्रशासनावर आमचा विश्वास आहे परंतू तपास यंत्रणेतला अजून गती येणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन साडेगाव येथील श्रीराम मंदिराचे मठाधिपती सुरेश महाराज रामदासी यांनी श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथे केले. श्रीक्षेत्र साडेगाव ते श्रीक्षेत्र जांबसमर्थ पायी दिंडीचे  गुरुवारी (दि.01) आयोजन साडेगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले होते.
मूर्ती चोरीच्या घटनेचा निषेध म्हणून घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र साडेगाव (समर्थ रामदास स्वामी स्थापित मठ) ते श्रीक्षेत्र जाबसमर्थ पायी दिंडीचे आयोजन दि.१ सप्टेंबर रोजी केले होते. सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही दिंडी साडेगावहून जांबेकडे मार्गस्थ झाली होती. ती सायंकाळी सहा वाजता जांब गावी पोहोचली. यावेळी साडेगाव येथील श्रीराम मंदिराचे मठाधिपती सुरेश महाराज रामदासी, अंकुशराव बोबडे, पांडूरंग महाराज आनंदे, सरपंच बाळासाहेब तांगडे, माजी सरपंच बाबासाहेब तांगडे, बालासाहेब महाराज शास्त्री यांची उपस्थिती होती. सदरील दिंडी साडेगावहून श्रीकृष्ण नगर, तिर्थपूरी, खालापूरी, खडका, लिंबोनी, कुंभार पिंपळगाव मार्गे जांबेत दाखल झाली. समर्थांनी ११०० मठांची स्थापना भारतभर केली आहे. त्यातीलच एक साडेगाव येथील समर्थ स्थापित रामदासी मठ होय.
यावेळी बोलतांना सुरेश महाराज रामदासी म्हणाले की, साडेगाव आणि जांबच अतूट संबंध असून हे नाते समर्थ रामदास स्वामींनी जोडले आहे. त्यामुळे आमचे जांब गावाविषयी कायमच ऋणानुबंध राहिलेले आहेत. मूर्ती चोर कोण आहेत हे आम्हाला माहित नाही परंतू आम्हाला आमच्या चोरीला गेलेल्या मूर्त्या त्वरीत मिळाव्यात यासाठी पोलिस प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत. तसेच श्रीराम प्रभूंना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला होता. तसेच चौदा दिवसांचा वनवास भोगून श्रीराम प्रभू नक्कीच पून्हा जांबेत येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पोलिस प्रशासनावर आमचा विश्वास असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बारा दिवसांचा कालावधी उलटूनही तपास ‘जैसे थे’ च
घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या देवघरातील श्रीरामचंद्र, सीतामाता, लक्ष्मणासह अन्य सहा मूर्तींची चोरी होऊन बारा दिवसांचा कालावधी उलटला असून पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. आज पर्यंत जांबसमर्थ येथील ग्रामस्थांनी विविध प्रकारची आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. परंतू त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट तपासात अजून दिरंगाई होत असल्याचे गावकºयांमधून बोलले जात आहे. आ.राजेश टोपे यांनी सुद्धा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडला होता.

रामभक्त आक्रमक होण्यास वेळ लागणार नाही
घटनेचे गांभीर्य पाहता चोरीला दहा दिवसांचा कालखंड उलटून गेला आहे. परंतू पोलिसांच्या हाती कुठलाच पुरावा लागला नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनीही फोनद्वारे पोलिस अधिकाºयांना सुचना केल्या आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुद्धा तपासाची चक्रे फिरवली आहेत. परंतू कोणताही धागादोरा अद्याप हाती लागला नाही. जर घटनेच्या तपासात असाच विलंब होत गेला तर रामभक्त पुन्हा आक्रमक होण्यास वेळ लागणार नाही.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!