जालना जिल्हा
वीज पडून वसंतनगर(डावरगाव) येथील एकाचा दुर्दैवी मृत्यू:


प्रतिनिधी(सिंदखेडराजा) तालुक्यातील वसंत नगर डावरगाव येथील वसंत विक्रम चव्हाण वय वर्ष 41 हे आपल्या शेतामध्ये काम करीत असताना संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान अचानक आभाळ व पाऊस पडत असल्यामुळे ते शेतामध्ये झाडाखाली थांबले होते.याच वेळी त्यांच्यावर नियतीचा आघात झाला आणि त्यांच्या अंगावर वीज पडली आणि त्यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.
ही घटना दिनांक ०१/०९/२०२२ रोजी गुरुवारी संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान वसंतनगर डावरगाव येथे घडली आहे.या घटनेमुळे परिसरामध्ये हळ-हळ व्यक्त होत आहे.वसंत चव्हाण हे विक्रम महाराज यांचे चिरंजीव होते.त्यांचे कुटुंब हे धार्मिक व सांप्रदायिक आहेत.वसंत विक्रम चव्हाण हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी,मुलगा,मुलगी,आई,वडील असा परिवार आहे.कुटुंबप्रमुख गेल्यामुळे त्यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सदर ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला असून,पुढील कार्यवाहीसाठी त्यांचे पार्थिव सिंदखेडराजा वैद्यकीय दवाखाना येथे दाखल करण्यात आला आहे.या नैसर्गिक घटनेमुळे त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्याकडून होत आहे. त्यांच्या जाण्याने फार मोठा आघात झाला असून,त्यांची कुटुंबाची हानी भरून काढणे हे काही शक्य नाही.