Video :चक्रीवादळाने नुकसान झालेल्या वडीगोद्री,सुखापूरी व गोंदी मंडळातील सरसकट पंचनामे करा-आ.राजेश टोपे.

अंबड:राज्याचे माजी मंत्री तथा आ.राजेश टोपे यांनी वडीगोद्री,सुखापूरी व गोंदी मंडळातील चक्रीवादळाने ऊस, सोयाबीन,कापूस व मोसंबी, डाळिंबसह आदी पिकांचे दिनांक 03 सप्टेंबर 2022 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान आलेल्या वादळाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.सदरील नुकसान पाहणी दौरा केला.
यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस,नायब तहसिलदार सौ.भालचम,गटविकास अधिकारी श्री.जमदडे,महावितरणचे कार्यकारी अभियंता यावेळी उपस्थित होते.
यावेळी आ.राजेश टोपे यांनी अंबड तालुक्यातील शहापूर, वडीगोद्री व पाथरवला खू.या गावातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन चक्रीवादळाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.वडीगोद्री,सुखापूरी व गोंदी मंडळातील चक्रीवादळाने ऊस, सोयाबीन,कापूस व मोसंबी, डाळिंबसह आदी पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.तसेच शेतातील व गावठाणचे पोल पडले आहेत तर काही मोडले आहेत
त्यामुळे अनेक गावांचा विद्युतपुरठा खंडित झाला आहे.सदरील पोल तात्काळ उभे करून विद्युतपुरठा सुरळीत करण्याच्या अधिकारी यांना सूचना दिल्या.