गंगाचिंचोली येथे वादळीवाऱ्यासह पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी शेतकऱ्यांनी मागणी
जालना प्रतिनिधी :अंबड तालुक्यातील गंगाचिंचोलीसह काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वेळी सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी उसाचे पीक आडवे झाले आहेतर काही ठिकाणी कापसाची झाडे ही आडवी झाली असून ऊसाचे ही मोठे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे मोसंबी पडल्याचे दृश्य फळबागांमध्ये दिसून येत आहे एकंदरीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात काही ठिकाणी पाऊस झाला अंबड तालुक्यातील गंगाचिंचोली परिसरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे उंच वाढलेला ऊस अक्षरशः भुई सपाट झाला येत्या महिना अथवा दोन महिन्यात कारखान्याला जाणारा ऊस कारखान्याला जाण्यापूर्वीच वाऱ्यामुळे आडवा झाल्याने ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे खरीपातील प्रमुख नगदी पिक म्हणून ओळख असलेल्या कापसाचे झाडे ही या वादळाच्या तडाख्यातुन सुतली नाहीत. ऊस कपाशीसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी गंगाचिंचोली येथील शेतकऱ्यांनी केली आहे
शनिवारी झालेल्या पावसापूर्वी सोसाट्याचा वारा सुटल्याने ऊस, कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेली पिके काढणीपूर्वीच भुईसपाट झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे.यावेळी तानाजी दादाभाऊ कांबळे,माधव गंगाराम घमाट,पांडुरंग माधव घमाट,सुदाम आश्रुबा गोडबोले,
परमेश्वर लक्ष्मण गहिरे,सुरेश दिगंबर गहिरे,दिगंबर गुळवने,
सवित्रा गणपत राऊत,परमेश्वर सखाराम श्रावणे,प्रताप गोरख श्रावणे शेतकऱ्यांची मागणी