घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
राजुरकरकोठा येथील किरण घुमरे याचे नीट परीक्षेत घवघवीत यश
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
वैद्यकीय क्षेत्राच्या राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या नीट-यूजी परीक्षेचा निकाल बुधवार (ता.सात) रोजी जाहीर करण्यात आला.यात घनसावंगी तालुक्यातील राजुरकर कोठा येथील किरण रामेश्वर घुमरे याने ७२० पैकी ५७१ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.बुद्धिमान असलेल्या किरण घुमरे यांने नीट परीक्षेत चांगले गुण मिळवू आणि वैद्यकीय शाखेत प्रवेश घेवू असा त्यांना ठाम आत्मविश्वास होता.अखेर त्यांच्या या अथक प्रयत्नांना शेवटी यश मिळाले.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.