राजेश टोपे-सतिषराव घाटगे यांच्यात दुरंगी लढत ?
न्यूज जालना/प्रतिनिधी
सतिशराव घाटगे पाटील आयोजित समृध्दी गणेश फेस्टिवल मध्ये मागील 10 दिवसापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामधे दि. 6 तारखेला सुरेखा पुणेकर प्रस्तुत नटरंगी नार या कार्यक्रमासाठी माजी आ. विलास बापू खरात यांनी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती लावली ,तसेच दि. 8 तारखेला रानबाजार फेम सिनेअभनेत्री माधुरी पवार यांचा लावण्याचा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जालण्याचे शिंदे गटाचे माजी आमदार अर्जुनराव खोतकर तसेच
घनसावंगी शिवसेनेचे माजी आ.शिवाजीराव चौथे साहेब यांनीही प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली .
या प्रसंगी अर्जुन खोतकर यांनी मनोगत व्यक्त करताना माननीय सतीश घाटगे पाटील यांनी उद्योगाबरोबर राजकारणात उतरून चांगली प्रगती करावी. यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन प्रस्ताव घेवून आलो असून सतीश घाटगे यांना राजकीय आमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलो असल्याचे त्यांनी उपस्तीत जनतेला सांगितले .यावेळी सतीश घाटगे यांना विचारले असता अर्जुन खोतकर यांच्या विधानावर येणाऱ्या काळात नक्कीच विचार करू असे सांगितले .घनसावंगी तालुक्यात मागील निवडणूककित शिवसेना, राष्ट्रवादी अशी लढत झाली होती यावेळेस जर शिवसेना सह, शिंदे गट व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होऊ शकते परंतु अनेक जर घाटगे पाटील यांच्या राजकीय निर्णयाकडे ही लढत दुरंगी असेल की तिरंगी हे येणाऱ्या काळात समोर येईल .
तसेच तालुक्यातील राजकीय वजन पाहता समृध्दी शुगर्सचे चेअरमन यांच्याकडे दोन साखर कारखाने असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाची समस्या सुटलेली आहे .
दरम्यान अर्जुन खोतकर यांच्या विधानांने तालुक्यातील राजकीय चर्चेला उधाण आले असून अनेकांकडून तर्क-वितर्क लावले जात आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलीच लढत पाहायला मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावावर मा.सतीशराव घाटगे पाटील काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लक्ष आहे.
समृध्दी उद्योगसमूहाचे घनसावंगी ,अंबड,परतूर, पाथरी तसेच सोनपेठ या ठिकाणी 10 ते 15 हजार ऊस उत्पादक सभासद असल्यामुळे कमीत कमी 80 ते 90 हजार ऊस उत्पादक मतदार यांच्या मतदानाचा फायदा पक्षाला होवू शकतो त्यामुळे येणाऱ्या काळात सतिशराव घाटगे शिंदेसेनेत जातात का भाजप मद्ये जातात यावर मतदाराचे समीकरण बदलू शकतात.
अंबड ,घनसावंगी आणि पाथरी मतदासंघांत विधानसभेसाठी जमेची बाजू असल्यामुळे सर्व विधानसभा मतदारसंघातील नेत्यांचे लक्ष सतीशराव घाटगे पाटील यांच्या भूमिकेकडे लागले आहे.