अंबड तालुकाजालना जिल्हा

वेदांत बॉक्स फॉक्सकॉन प्रकरणी अंबड शहरात युवासेनेची निदर्शने करत स्वाक्षरी मोहिम

images (60)
images (60)

न्यूज जालना प्रतिनिधी/अंबड,


अंबड शहरात युवासेनेच्या वतीने राज्यभर गाजत असलेल्या ‘वेदांता’ फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरात ला गेल्या बाबत गुरूवार (ता.१५) रोजी निदर्शने व स्वाक्षरी मोहीम माजी आमदार शिवाजीराव चोथे व माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली राबवत शिंदे-फडणीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
माजी आमदार संतोष सांबरे यांनी हा प्रकल्प गुजरात ला जाणे हा ह्या खोके सरकार च अपयश असून दिल्लीच्या तालावर नाचणार हे सरकार असल्याची टीका केली, तर युवा सेनेचे विनायक चोथे यांनी, हे इडी सरकार महाराष्ट्रद्रोही आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेच्या अथक प्रयत्नाने मागच्या काळाय हा तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ शकणारा प्रकल्प महाराष्ट्र आला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती दिल्लीच्या हुकुमशाहानी सहन न होऊन त्यांनी घोडेबाजार करत राज्यात हे खोके सरकार आणलं आणि हा प्रकल्प गुजरातला पळवत मराठी माणसाच्या पोटावर लाथ मारली असा घणाघात करत केला.
निदर्शन करून ह्या घटने विरोधात स्वाक्षरी मोहीमही घेण्यात आली असता, नागरिकांनी यास प्रतिसाद दिला. यावेळी हनुमान धांडे, अशोक बरडे, भरत सांबरे, कुमार रूपवते, रामसेठ लांडे, बंडु काका पागीरे, अमोल ठाकुर, नुंदकुमार पुंड, बाबु लांडे, रवी इंगळे, विक्रम भागवत, संदिप सदावर्ते, अभिजित खटके, राहुल सोळंके,सचिन शेरे, सतीष धुपे, शाम रोठोड, कल्याण टकले, मुकुंद हुसे, शैलेश दिवटे, शिवाजी तारडे, अमोल टोपे, गणा पाटील ज-हाड इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!