जालना जिल्हा

प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई तालुकानिहाय विमा प्रतिनिधीचे नाव, संपर्क क्रमांक

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत नुकसान भरपाईसाठी पिक नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत विमा कंपनीस कळविणे बंधनकारक

images (60)
images (60)

जालना, दि. 20 (प्रतिनिधी) :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिक नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे.

जेणेकरुन विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळू शकेल.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2022 जालना जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरंस कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास,भूस्खलन,गारपीठ,ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखमीअंतर्गत पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शिरून दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे 72 तासाच्या आत नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो.

तथापि विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पिक नुकसानीची माहिती कंपनीस देणे आवश्यक आहे.

त्यासाठी पिक विमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून Crop Insurance (क्रॉप इन्शुरन्स) हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा एचडीएफसी इरगो विमा कंपनीच्या 1800 266 0700 या टोल फ्री क्रमांकावर किंवा विमा कंपनीचे ‘पिहू whatsapp bot’(7304524888) याद्वारे नुकसानीची माहिती द्यावी.

तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमद्वारे विमा कंपनीस माहिती देऊ न शकल्यास विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी किंवा जिल्हा प्रतिनिधी, संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याकडे प्रत्यक्ष 2 प्रतीत अर्ज देऊन एका प्रतीवर पोहोच घ्यावी,
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे यांनी केले आहे.

तालुकानिहाय विमा प्रतिनिधीचे नाव, संपर्क क्रमांक व कार्यालयाचा पत्ता पुढील प्रमाणे आहे. जिल्हा कार्यालय-आरिफ शेख-8830899953-पत्ता-धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, भारत पेट्रोल पंपच्या विरुध्द बाजुला, अंबड रोड, जालना-431203, जालना, जालना त्र्यंबकेश्वर मोरे-7972925979- एचडीएफसी बँक जवळ, शिवाजी महाराज चौक, जालना -431203, घनसावंगी सुदर्शन जाधव – 8007020867- अष्टांग कॉम्प्लेक्स, तहसील कार्यालय जवळ, घनसावंगी – 431209, भोकरदन अलीम शेख- 9049134849- गुरुकृपा कॉम्प्लेक्स बस स्थानक जवळ, भोकरदन- 431114, अंबड– मोरेश्वर गवळी-7620102571- नेहा बेकरीच्या समोर, मुख्य रस्ता अंबड – 431204, बदनापूर – विजय बोहाटे-8007351600- जालना- औरंगाबाद हायवे, एसबीआय बँक शेजारी, बदनापूर -431202, जाफ्राबाद– वसीम अहमद-8766775222-बाजारगल्ली, बस स्थानक जवळ, जाफ्राबाद 431206, मंठा योगेश जाधव-7774936085 जालना- जिंतूर रोड, रायगड हॉटेलच्या पाठीमागे मंठा – 431504, परतुर हरिओम गोरे – 8308998331 एलबीएस ज्युनिअर कॉलेज रोड, मराठा क्रांती भवनच्या विरुध्द बाजुला परतुर 431501, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे यांनी कळविली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!