घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
जांबसमर्थ येथे स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण सर्वेक्षण
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेंतर्गत सर्वेक्षण व भुमि अभिलेख विभाग यांच्या वतीने अत्याधुनिक ड्रोन कॅमेराद्वारे ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागा मोजणीचे सर्वेक्षण करण्यात आले.यावेळी सर्वेक्षण विभागाचे व्ही.के. बहूरे,भूमापक पी.पी.जोशी,टी एम.उबाळे,पी बी.साळवे यांच्यासह भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक मालमत्ताधारकाचे स्वतंत्र प्रापर्टी कार्ड तयार करून मुळ मालकास कार्यालयात उपलब्ध होणार आहे.त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित जागा मालकी हक्क बाबतचा प्रश्न सुटणार असून प्रत्येक नागरीकांनी भविष्यातील गरज समजून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.