विरेगव्हाण तांडा येथे शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही ईश्वर दुर्गा माता मंडळाच्या वतीने सोमवार (दि.२६) ते चार ऑक्टोंबर दरम्यान नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मागील गेल्या सत्तावीस वर्षांपासून सुरू असलेली ही शारदीय नवरात्र उत्सवाची परंपरा यावर्षीही संयोजक व ग्रामस्थांनी कायम राखली आहे.यात दररोज पहाटे सकाळी काकडा आरती,सकाळ-संध्याकाळ दुर्गा माता आरती,हरीपाठ,बंजारा भजन,सांप्रदायिक भजन,होमहवन,पुर्णाहुती,असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे.यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत बंजारा समाज प्रबोधकार हजेरी लावणार आहेत.शेवटी महाप्रसाद वाटपाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी आयोजित बंजारा भजन श्रवण व महाप्रसादाचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन आयोजक ह.भ.प.साहेबराव महाराज राठोड,ह.भ.प.भिमराव महाराज राठोड,बाबुराव राठोड,तुकाराम पवार,वसंत पवार,रावसाहेब राठोड,सोपान राठोड,अमोल राठोड यांच्यासह आदी ग्रामस्थांनी केले आहे.