घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

संत रामदास महाविद्यालय घनसावंगी येथे साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

प्रतिनिधी/कुलदीप पवार

images (60)
images (60)

घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालय येथे दि.१० व ११ डिसेंबर रोजी स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा साहित्य परीषदेचे ४२ वे साहित्य संमेलन महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
या साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन व बोधचिन्हाचे प्रकाशन गीतकार कवी तथा नाट्यलेखक प्रा.दासू वैद्य यांच्याहस्ते आज दि.७ आक्टोंबर 2022 वार शुक्रवार रोजी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव चोथे,जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे,मा.आ.संतोष सांबरे,राजकुमार तांगडे,केंद्रीय कार्यकारीणीच्या सदस्या संजीवनी तडेगावकर,प्रा.रमेश भुतेकर,जयराम खेडेकर पंडित तडेगावकर,पांडुरंग कथले,महेंद्र पवार नंदकुमार देशमुख, सुभाष बोंद्रे, श्रीकृष्ण बोबडे,रविंद्र तौर,शहाजी देशमुख देवनाथ जाधव,रामेश्वर वाडेकर,उद्धव मरकड,महादेव काळे,हरीहर शिंदे, कल्याण सपाटे,राजेश देशमुख, राम सावंत, हनूमान धांडे,गटशिक्षणाधिकारी रविंद्र जोशी,पंडीतराव तडेगावकर, प्रा.ज्योती धर्माधिकारी डॉ. राम गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र परदेशी संस्थेचे सचिव विनायक चोथे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!