अंबड आगारप्रमुखांच्या लेखी आश्वासनानंतर कुंभार पिंपळगाव येथील बस टायर पंक्चर आंदोलन मागे
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव हे तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव आहे.मात्र या महामार्गावरून लांब पल्ल्याच्या बसेस धावत नसल्याने प्रवाशी व व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होत आहे.
मागील अनेक वर्षापूर्वी या महामार्गावरून अंबड आगाराची अंबड-सेलू,अंबड-माजलगाव, अंबड-मेहकर, जालना आगाराची जालना-जांबसमर्थ परतूर आगाराची परतूर-सज्जनगड, परतूर-बीड,पाथरी आगाराची पाथरी ते कुं.पि.(मुक्कामी) अंबड-लातूर, अंबड-नांदेड परतूर आगाराची परतूर कुं.पि.पुणे तर पाथरी आगाराची पाथरी -अंबड या बसेस धावत होत्या.मात्र,या बसेस अनेक कारणामुळे बंद करण्यात आल्या आहेत. या मार्गावरील बंद झालेल्या बससेवा पूर्ववत सुरू कराव्यात नसता दि.(10 )आक्टोंबर पासून येथील बसस्थानकात येणाऱ्या बसेसच्या टायर पंक्चर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामविकास युवा मंचने दिला होता.
सदरील निवेदनाची तात्काळ दखल घेत विभाग नियंत्रक जालना यांच्या सुचनेवरून अंबड आगारप्रमुख सुरेश टकले यांनी शनिवार (8) रोजी बसस्थानकात भेट दिली.व येत्या दि.17 आक्टोंबर पासून दिवाळी हंगामात लांब पल्ल्याच्या बससेवा पूर्ववत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.त्यामुळे हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. यावेळी ग्रामविकास युवा मंचचे पदाधिकारी, ग्रामस्थ,प्रवाशी यांची उपस्थिती होती.