घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

यावलपिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रोहिणी उगले यांची बिनविरोध निवड

न्यूज जालना :प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील यावलपिंपरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या रोहिणी राजकुमार उगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरपंचपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या रोहिणी राजकुमार उगले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच दादाराव कांबळे,ग्रा.पं.सदस्या राजामती उगले,शिला कांबळे,यांची उपस्थिती होती.याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नागलवाड यांनी काम पाहिले.तर ग्रामसेवक शहाणे यांनी सहकार्य केले.या निवडीबद्दल सौ.उगले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!